नमस्कार,

संसदेत मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात भौगोलिक वैविध्य आहे. शहरी, निमशहरी, ग्रामीण आणि दुर्गम असे सर्वच भाग या मतदारसंघात येतात. वैविध्याची हि समृद्धी लक्षात घेऊनच मी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक स्वप्न अर्थात व्हिजन डोळ्यासमोर ठेवले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा सर्वंकष विकास, सर्वांसाठी खुले असणारे रोजगारभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण, दळणवळण व संपर्काच्या उत्तम सुविधा, वंचित समाजघटकांना संधी व न्याय आदींचा प्राधान्याने समावेश आहे. याशिवाय सर्वांसाठी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, उद्यमशिलतेला प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मिती, निमशहरी भागांचा सर्वंकष विकास आदी प्रमुख मुद्यांचा समावेश आहे. विशेषतः शहरी असो वा ग्रामीण या भागातील कचराप्रश्न कायमचा निकाली कसा लागेल याकडे माझे अधिक लक्ष आहे. जनतेच्या हितासाठी आणि त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी खासदार या नात्याने जे काही करण्यासारखे आहे, ते करण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ

 1. वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा
 2. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळून ते राष्ट्रनिर्मितीस हातभार लावतील यासाठी अधिक रोजगार निर्मितीवर भर
 3. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे
 4. प्रत्येक मुला-मुलीस शिक्षण मिळावे याकडे लक्ष पुरविणे. उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य होईल अशी केंद्रे स्थापन करणे.
 5. व्यावसायिक शिक्षणाची सहज उपलब्ध होतील अशी केंद्रे उभारणे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ उद्योगांना उपलब्ध होईल
 6. दळणवळणाच्या सुविधा बस, रेल्वे इ. इ. अधिक सक्षम करणे
 7. पर्यटनाच्या संधी निर्माण करुन परिसराचा विकास करणे
 8. दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीचा मुद्दा प्राधान्याने सोडविणे
 9. शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे सासवड, इंदापूर, दौंड अशा शहरांचा विकास आवश्यक त्या वेगाने आणि सुनियोजीत पद्धतीने होत नाही. त्यामुळे अशा शहरांसाठी नव्याने विकास आराखडा तयार करुन त्यांचा विकास करणे.
 10. आपला मतदारसंघ अपंग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक, निराधार आणि अनाथ अशा वंचित घटकांना आपलेपणाने सामावून घेणारा व्हावा यावर माझा भर आहे.
 11. मतदारसंघातील लिंगगुणोत्तर हे समतोल असावं, स्त्रीभ्रुणहत्यामुक्त गावे व्हावीत, मुलींना प्रगतीच्या उत्तम संधी मिळाव्यात.
 12. या मतदारसंघातील महिलांचा सन्मान आणि सुरक्षा अबाधित राखावी, महिलांचे सक्षमीकरण व्हावे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा हा मतदारसंघ व्हावा अशी आमची भूमिका आहे.
 13. आपल्या मतदारसंघातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड मिळाले पाहिजे. या माध्यमातून त्यांची ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी होईल. बारामती लोकसभा मतदारसंघ अॅनिमिया आणि कुपोषणमुक्त झालेला देशातला पहिला मतदारसंघ असेल.
 14. अंगणवाड्यांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्याकडे आमचा कटाक्ष आहे. या अंगणवाड्यांमध्ये बहुजन, कष्टकरी समाजाची मुलं शिक्षण घेतात. या अंगणवाड्यांना पाणी आणि वीज पुरवली जाईल.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, बारामती, दौंड आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ येतात. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या अधिकाधिक विकासासाठी मी काही स्वप्ने पाहिली आहेत. प्रत्येक विधानसभानिहाय तेथील विकासाचे प्रमुख मुद्दे, समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांचे प्रश्न, भौगोलिक, ऐतिहासिक, सामरिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ते निश्चित करण्यात आले आहे. त्याचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे

बारामती विधानसभा मतदारसंघ

 1. बारामती शहरातील रेल्वेचा मालधक्का शहराच्या बाहेर इतरत्र स्थलांतरीत करण्याबाबत पाठपुरावा करणे
 2. रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामास गती देणे
 3. पासपोर्ट कार्यालय पुर्ण क्षमतेने सुरु करणे
 4. मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढविण्याबाबत प्रयत्न करणे
 5. बारामती विमानतळ हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे विमानतळ असल्याने त्याचा आणखी विकास करता येईल का त्याची चाचपणी करणे
 6. बारामती-मुंबई रेल्वे सुरु करणे
 7. वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे
 8. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळून ते राष्ट्रनिर्मितीस हातभार लावतील यासाठी कौशल्य विकास आणि अधिक रोजगार निर्मितीवर भर
 9. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे
 10. प्रत्येक मुला-मुलीस शिक्षण मिळावे याकडे लक्ष पुरविणे. उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य होईल अशी केंद्रे स्थापन करणे.
 11. व्यावसायिक शिक्षणाची सहज उपलब्ध होतील अशी आणखी केंद्रे उभारणे
 12. दळणवळणाच्या सुविधा बस, रेल्वे इ. इ. अधिक सक्षम करणे
 13. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे

इंदापूर विधानसभा मतदारसंघ

 1. गेल्या काही वर्षांतील नागरिकीकरण आणि इतर कारणांमुळे इंदापूर शहराचा विस्तार झाला आहे. या तुलनेत येथील सोयीसुविधा आणखी मजबूत करण्याची गरज असून या शहराचा नव्याने विकास-आराखडा मांडावा लागणार आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांची शहराची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येतील. इंदापूर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा आणि दळणवळण आदींचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात येईल.
 2. इंदापूर तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आहे. गेल्या काही वर्षांत विशेषतः २०१४ नंतर येथे नवे उद्योग येण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे येथे उत्तम रोजगारनिर्मिती होऊ शकेल असे उद्योग नजीकच्या काळात यावेत यासाठी प्रयत्न करणार.
 3. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा आणखी उत्तम दर्जाची मिळावी यासाठी प्रयत्न करणार. याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द्राक्ष आणि डाळींब उत्पादकांना आपला माल साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. त्याबाबतही प्राधान्याने प्रयत्न करणार
 4. तालुक्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर माझा भर असेल.
 5. शिक्षणाच्या सुविधांबाबत अधिक सजग राहून समाजातील प्रत्येक घटकास सर्वांना परवडेल असे शिक्षण मिळेल याकडे लक्ष देणे. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास याला प्रोत्साहन देणे
 6. समाजातील प्रत्येक घटकास परवडेल अशा पद्धतीच्या उत्तम दर्जाच्या आणि तत्पर आरोग्य सुविधा निर्माण करणे
 7. शहरे असोत किंवा खेडी प्रत्येक ठिकाणी सांडपाणी आणि कचरा यांच्या निचऱ्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करणे
 8. मोबाईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे
 9. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे

दौंड विधानसभा मतदारसंघ

 1. दौड शहर हे रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या शहराची वाढत्या नागरिकीकरणाशी सुसंगत अशी रचना करणे आवश्यक आहे. यासाठीचा विकास आराखडा तयार करुन त्यानुसार सुविधा निर्माण करणे
 2. या भागातील रेल्वेसंदर्भातील प्रश्न सोडविण्याबाबत पाठपुरावा करणे
 3. डेमू अधिक सक्षमपणे सुरु राहील याबाबत पाठपुरावा करणे
 4. प्लॅटफॉर्मच्या उंचीसंदर्भातील प्रश्न मार्गी लावणे
 5. पुणे-दौंड या मार्गावर फास्ट लोकल सुरु करणे
 6. रेल्वेलगतच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन
 7. वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा
 8. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळून ते राष्ट्रनिर्मितीस हातभार लावतील यासाठी कौशल्य विकास आणि अधिक रोजगार निर्मितीवर भर
 9. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे
 10. प्रत्येक मुला-मुलीस शिक्षण मिळावे याकडे लक्ष पुरविणे. उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य होईल अशी केंद्रे स्थापन करणे.
 11. व्यावसायिक शिक्षणाची सहज उपलब्ध होतील अशी केंद्रे उभारणे
 12. दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करणे
 13. मोबाईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे
 14. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे

पुरंदर विधानसभा मतदारसंघ

 1. पुरंदर तालुका ही महात्मा जोतीराव फुले यांची भूमी आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी याच तालुक्यात येते. महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी खानवडी या गावी छोटे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार
 2. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले आहे. ते सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकीकरणाचा वेग वाढणार आहे. हे नागरिकीकरण आवश्यक त्या सोयीसुविधांशी उदा. दळणवळण, रस्ते, पाणी इ. इ. सुसंगत व सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्न करणे
 3. या भागातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील भाविकांसाठी श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र जेजुरी गडाचा विकास करणे. हे क्षेत्र केंद्र सरकारच्या पर्यटनाशी संबंधित योजनेच्या नकाशावर प्राधान्याने यावे यासाठी पाठपुरावा करणे
 4. पुरंदर तालुक्यात जलसंधारणाची कामे प्रभावी पद्धतीने आणि चिरस्थायी स्वरुपाची करण्याची आवश्यकता आहे. याकडे अधिक लक्ष पुरविण्यावर माझा भर आहे.
 5. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यावर माझा भर आहे.
 6. तालुक्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन व्हावे अशी आमची भूमिका असून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. आगामी काळात त्यावर सर्वसामान्य, सर्वसंमत आणि सन्मानजनक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे.
 7. मोबाईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे
 8. शिक्षणाच्या सुविधांबाबत अधिक सजग राहून समाजातील प्रत्येक घटकास सर्वांना परवडेल असे शिक्षण मिळेल याकडे लक्ष देणे . व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास याला वाव देण्याबाबत सजग राहणे
 9. समाजातील प्रत्येक घटकास परवडेल अशा पद्धतीच्या उत्तम दर्जाच्या आणि तत्पर आरोग्य सुविधा निर्माण करणे
 10. सासवड, जेजुरी अशा शहराची वाढत्या नागरिकीकरणाशी सुसंगत अशी रचना करणे आवश्यक आहे. यासाठीचा विकास आराखडा तयार करुन त्यानुसार सुविधा निर्माण करणे
 11. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा डिपीआर तयार करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
 12. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे

भोर- वेल्हा- मुळशी विधानसभा मतदारसंघ

 1. पर्यटनाच्या दृष्टीने अत्याधिक उपयुक्त असणारा हा भाग आहे. कोकणाच्या उंबऱ्याशी उभा असणाऱ्या या भागाला नैसर्गिक सौदर्याचं वरदान लाभलेलं आहे. या भागात मोबाईलची कनेक्टिव्हीटी वाढविण्यासाठी ( मोबाईलचे टॉवर उभारणी इ. इ. ) प्रयत्न करणे
 2. या भागात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करण्यास भर
 3. रोहिडेश्वर - रायरेश्वर या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास
 4. ग्रामीण भागात केंद्रीय योजनांतून दळवळणाच्या सोयीसुविधा निर्माण करणे
 5. भोर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावणे
 6. वेल्ह्यास कोकणाशी जोडणाऱ्या मढे घाटाचा मुद्दा मार्गी लावणे
 7. नीरा-देवधर धरणाचे कालवे पुर्ण क्षमतेने सुरु करणे
 8. यासाठी त्यांची कामे पुर्ण करण्याबाबत पाठपुरावा करणे
 9. भोर मार्गे महाड हा कोकणात जाणारा मार्ग विस्तारीकरण करणे
 10. भोर-मांढरदेवी रस्त्यावर बोगदा निर्माण करण्याबाबतच्या शक्यतांची पडताळणी करणे
 11. मुळशी येथे थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांच्या स्मारकाचा विस्तार करणे
 12. शिवकालिन टाक्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांचा वापर करुन घेण्यासाठी आराखडा करणार
 13. वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि सजग करणार
 14. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळून ते राष्ट्रनिर्मितीस हातभार लावतील यासाठी अधिक रोजगार निर्मितीवर भर यासाठी कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणावर भर
 15. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे
 16. प्रत्येक मुला-मुलीस शिक्षण मिळावे याकडे लक्ष पुरविणे. उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य होईल अशी केंद्रे स्थापन करणे.
 17. भोर शहर तसेच हिंजवडी परिसराची वाढत्या नागरिकीकरणाशी सुसंगत अशी रचना करणे. यासाठीचा विकास आराखडा तयार करुन त्यानुसार सुविधा निर्माण करणे. हिंजवडीसारख्या आयटी केंद्रीत भागात वाहतूक व कचरा कोंडीवर कायमस्वरुपी मार्ग काढणे
 18. दळणवळणाच्या सुविधा बस, रेल्वे इ. इ. अधिक सक्षम करणे

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

 1. खडकवासला हा मतदारसंघ बहुतांश शहरी पट्ट्याशी संबंधित असून या भागात बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरीकरण सुरु आहे.
 2. या भागात वायसीएमच्या धर्तीवर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची आवश्यकता आहे. यासंदर्भात पावले उचलणार
 3. पुणे मेट्रो स्वारगेट ते खडकवासला व्हावी या मागणीचा पाठपुरावा करणार
 4. या भागातील शहरीकरणाशी संबंधित विषय उदा. पाणीपुरवठा, स्वच्छता, नव्या सोसायटी आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे
 5. संरक्षण विभागाशी संबंधित मुद्दे अधिक प्राधान्याने सोडविणे
 6. शहरांना आणि खेड्यांना जोडणारे रस्ते अधिक सक्षम करणे
 7. शहरालगतच्या अथवा शहरांतील नागरी सुविधांशी संबंधित मुद्दे सोडविण्यास प्राधान्य
 8. थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक उभारणे
 9. शहरातील स्वच्छता, आरोग्य, वाहतूक कोंडी याबाबत स्थायी उपाययोजना करणे
 10. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांबाबत उपाययोजना
 11. कामावर जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी उत्तम दर्जाची पाळणाघरे
 12. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मोबाईल कनेक्टिव्हीटीचा मुद्दा सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
 13. या मतदारसंघात ओपन जीम सुरु करणे
 14. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे
 15. मतदारसंघात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन तरुण आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणे
 16. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि योग्य बाजारभाव या त्रिसुत्रीच्या आधारे कार्यरत राहणे

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पाहिलेल्या स्वप्नांचे हे संक्षिप्त स्वरुप मी आपल्यासमोर मांडत आहे. आपला मतदारसंघ देशात सर्वाधिक प्रगत, शेतकऱ्यांना न्याय देणारा, विकसित, सामाजिक न्याय देणारा, सामाजिक जाणिवा जोपासणारा, शिक्षित आणि प्रशिक्षित, उद्यमशील व रोजगारक्षम असावा असे माझे स्वप्न असून ते पुर्ण करण्यासाठी अविश्रांत मेहनत करण्यास माझे प्राधान्य आहे.

धन्यवाद.
सुप्रिया सुळे , खासदार, बारामती